|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » सोवळे मोडले प्रकरण : पुण्यात 25 सप्टेंबरला मराठा क्रांती र्मार्चाचा निषेध मोर्चा

सोवळे मोडले प्रकरण : पुण्यात 25 सप्टेंबरला मराठा क्रांती र्मार्चाचा निषेध मोर्चा 

ऑनलाईन टीम / पुणे :

हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेघा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करून निर्मला यादव यांची मानहानी केल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 25 सप्टेंबरला पुण्यात निषेध मेर्चा काढण्यात येणार असून त्यांना त्वरीत अटक करून कायदेशी कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

लाल महाल ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हाअंतर्गत सर्व मराठा बहुजन संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. हा मोर्चा मुक मोर्चा नसून यात बहुजन आणि पुरोगामी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चेच्या वतीने देण्यात आली आहे.

मेधा खोले यांनी जात लपवून सोवळे मोडल्याचा आरोप करत निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी ही तक्रार मागे घेतली परंतु त्यानंतर निर्मिला यादव यांनी त्रास दिल्याचा आरोप करत खोलेंविरेधात तक्रार दाखल केली.

 

Related posts: