|Thursday, May 24, 2018
You are here: Home » उद्योग » अपना सहकारी बँकेला दोन पुरस्कार

अपना सहकारी बँकेला दोन पुरस्कार 

  • वृत्तसंस्था/ मुंबई
  • अपना सहकारी बँकेस दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. एफसीबीए आणि बँकिंग फ्रन्टिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उत्कृष्ट सहकारी बँकांना विविध श्रेणी आणि वैशिष्टय़ांसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी अपना सहकारी बँकेस ग्रीन इनिशिएटिव्ह-पेपरलेस आणि बेस्ट आयटी हेट या श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • बँकेने आतापर्यंत एफसीबीए आणि बँकिंग फ्रन्टियर्स यांच्या विविध श्रेणीतील पुरस्कार पटकावले आहे. या वर्षी बँकेला दोन पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल आपल्याला आनंद आहे. बँकेच्या संचालक मंडळाने पेपरलेस बँकिंग करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला आहे. तेव्हापासून सर्व व्यवहार संगणकामार्फत करण्यावर कल दिला आहे. त्यामुळे पेपरचा वापर कमी होत आहे. तसेच बँकेने स्वतःचे डेटा सेन्टर सुरू केल्याने अनेक व्यवहार त्या माध्यमातून केले जातात. तांत्रिक बाबतीत बँक सक्षम असून बँकेतील कर्मचारीच या बाजू सांभाळतात असे बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी म्हटले. बँकेच्या उप प्रमुख व्यवस्थापक आयटी प्रमुख स्वाती माने यांनी बेस्ट आयटी हेडचा पुरस्कार देण्यात आला.

Related posts: