|Thursday, May 24, 2018
You are here: Home » उद्योग » बहुप्रतीक्षित आयफोन 8 सादर

बहुप्रतीक्षित आयफोन 8 सादर 

  • वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
  • ऍपल या अमेरिकन कंपनीने पहिल्यांदा तीन स्मार्टफोन सादर केले. आरफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन एक्स या नावाने दाखल करण्यात आले. भारतात आयफोन 8 ची विक्री 29 सप्टेंबरपासून करण्यात येणार असून किंमत 64 हजार रुपयांपासून सुरू होईल. आयफोन एक्ससाठी दोन महिन्यांची वाट पहावी लागेल. हा फोन भारतात 3 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून 89 हजार रुपयांपासून किंमत सुरू होईल. कंपनीने आतापर्यंत 1.2 अब्जपेक्षा जास्त आयफोनची विक्री केली आहे. कंपनीने नवीन फोन लॉन्च केल्यानंतर जुन्या फोनच्या किमतीत चांगलीच कपात केली आहे.
  • ऍपल वॉच 3
  • मंगळवारी ऍपलकडून वॉच सीरिज 3 दाखल करण्यात आली. कंपनीच्या या अत्याधुनिक मनगटी घडय़ाळामध्ये एलटीई कनेक्टिव्हिटी असेल. सीरिज 2 दाखल करण्यात आल्यापासून वॉच विक्रीत 50 टक्क्यांनी वाढ झाली. या वॉचमध्ये सेल्युलर सेवा (ईसिम) असल्याने स्मार्टफोन घरी राहिला असेल तरीही वॉचवर सर्व सेवा उपलब्ध असतील. यावरून फोनकॉल करता येतील. सीरिज 2 पेक्षा नवीन वॉचचा प्रोसेसर 70 टक्के अधिक वेगाने काम करेल. तसेच हृदयाची स्पंदने मोजण्याची क्षमता यात आहे. 29 सप्टेंबरपासून सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे रंगात भारतात उपलब्ध होणाऱया या वॉचची किंमत 29,900 रुपयांपासून सुरू होईल.

आयफोन एक्स

  • आयफोनला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन एक्स सादर करण्यात आला. 5.8 इंच सुपर रेटिना डिस्प्ले असणारा हा स्मार्टफोन सर्वात महाग आहे. वायरलेस चार्जिंगची सुविधा असून ए11 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स असणार हा फोन स्पेस ग्रे, सिल्व्हर, गोल्ड फिनिश रंगात उपलब्ध होईल. 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या या फोनला होम बटन असणार नाही. डॉट प्रोजेक्टर, इन्फ्रारेड कॅमेरा, आणि चेहऱयांचे 3डी मॉडेल तयार करण्याची क्षमता या फोनमध्ये आहे. 12 मेगापिक्सल डय़ुअल कॅमेरा असणाऱया या फोनची किंमत 89 हजार रुपयांपासून सुरू होईल.

Related posts: