|Thursday, May 24, 2018
You are here: Home » उद्योग » भांडवली बाजारात तेजी उतार

भांडवली बाजारात तेजी उतार 

  • बीएसईचा सेन्सेक्स 28 ने वधारला, एनएसईचा निफ्टी 14
  • वृत्तसंस्था/ मुंबई
  • बुधवारी बाजारात चांगलीत तेजी उतार दिसून आली. दिवसाची सुरुवात सुस्तीनं झाली आणि काही वेळानंतर बाजारात खरेदी झाली. शेवटच्या तासात बाजारात दबाव निर्माण झाला होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स वधारत बंद झाला, तर निफ्टी घसरत बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,132 आणि सेन्सेक्स 32,348 पर्यंत वधारला होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स 32,200 आणि निफ्टी 10,100 च्या खाली बंद झाला.
  • बीएसईचा सेन्सेक्स 28 अंशाने मजबूत होत 32,186 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 14 अंशाने घसरत 10,079 वर बंद झाला.
  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात विक्रीचा दबाव दिसून आला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्याने घसरत 15,927 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 टक्क्याने कमजोर होत 18,822 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांने घसरत 16,520 वर स्थिरावला.
  • एफएमसीजी, धातू, वाहन, रिअल्टी, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात सर्वाधिक विक्री झाली. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 1.1 टक्के, धातू निर्देशांक 1.1 टक्का आणि वाहन निर्देशांक 0.5 टक्क्याने घसरला. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 1.1 टक्के, तेल आणि वायु निर्देशांक 1.7 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 0.4 टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.3 टक्क्याने कमजोर झाला.
  • औषध आणि पीएसयू बँक समभागात सर्वात जास्त खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 1.6 टक्क्यांपर्यंत वधारला होता, निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.4 टक्क्यांनी मजबूत झाला. बँक निफ्टी 0.2 टक्क्याने वधारत 24,832 वर बंद झाला.
  • दिग्गज समभागांची कामगिरी
  • टाटा पॉवर, सन फार्मा, रिलायन्स इन्डस्ट्रीज, डॉ. रेड्डीज बँक, बँक ऑफ बडोदा, ल्यूपिन आणि टाटा मोटर्स 4.7-0.7 टक्क्यांनी वधारले. बीपीसीएल, आयओसी, आयटीसी, इंडियाबुल्स हाऊसिंग, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, एचडीएफसी, सिप्ला आणि विप्रो 6.3-0.75 टक्क्यांनी घसरले.
  • मिडकॅप समभागात वोकहार्ट, डिवीज लॅब, बँक ऑफ इंडिया आणि ग्लेनमार्क 4.2-2.25 टक्क्यांनी वधारले. एचपीसीएल, ओबेरॉय रिअल्टी, अदानी पॉवर, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एक्साईड इन्डस्ट्रीज 5.1-3.5 टक्क्याने घसरले.

Related posts: