|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्ली विद्यापीठात एनएसयुआयला यश

दिल्ली विद्यापीठात एनएसयुआयला यश 

नवी दिल्ली

 दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा झटका देत काँग्रेसच्या एनएसयुआयने जोरदार पुनरागमन केले. एनएसयुआयने अभाविपचे वर्चस्व संपुष्टात आणत अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कब्जा केला. तर अभाविपला सचिव आणि संयुक्त सचिवाचे पद राखण्यास यश मिळाले. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विद्यार्थी संघ निवडणुकीत मिळालेल्या या विजयाला मोठे यश ठरविले.

कडक बंदोबस्तात बुधवारी किंग्सवे कँपनजीक एका सभागृहात दिल्ली विद्यापीठ  विद्यार्थी संघ निवडणुकांसाठी मतमोजणी झाली. एनएसयुआयच्या रॉकी तूशीदने अध्यक्षपदासाठी विजय मिळवत अभाविपचे 4 वर्षांपासून असणारे वर्चस्व संपुष्टात आणले.

डीयुएसयु अध्यक्षपदासाठी मुख्य उमेदवारांमध्ये अभाविपचे रजत चौधरी, एनएसयुआयचे रॉकी तूशीद, एआयएसएची पारल चौहान, अपक्ष उमेदवारा राजा चौधरी आणि अल्का यांचा समावेश होता. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील वर्षी अभाविपने तिन्ही पदांवर विजय मिळविला होता. तर एनएसयुआयने संयुक्त सचिवपदावर कब्जा केला होता.

अध्यक्षपदासाठी एकूण 24 उमेदवार, उपाध्यक्षपदासाठी 10, सचिवपदाकरता 4 आणि संयुक्त सचिवपदासाठी 5 उमेदवार रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीकरता 40 सकाळच्या सत्रात भरणाऱया महाविद्यालयांमध्ये ईव्हीएमचा अवलंब झाला. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत एकूण 1.32 लाख विद्यार्थ्यांनी मतदान केले.

Related posts: