|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

वंटमुरी कॉलनी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी त्याच कॉलनीतील एका तरुणाला अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी अपहरणाची ही घटना घडली होती.मेहबूब राजेसाब मुल्ला (वय 21 रा. वंटमुरी कॉलनी, जनता प्लॉट) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी मेहबूबला अटक केली. भादंवि 366 (ए) पोक्सो कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून मेहबूबला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. मंगळवारी त्रस्त 16 वर्षीय मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसीपी शंकर मारिहाळ पुढील तपास करीत आहेत.

 

Related posts: