|Thursday, January 17, 2019
You are here: Home » leadingnews » देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे पंतप्रधान मोदी -आबेंच्या हस्ते भूमिपूजन

देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे पंतप्रधान मोदी -आबेंच्या हस्ते भूमिपूजन 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

मुंबई-अहमदाबाद या महत्त्वकांक्षीसमजलेल्या जणाऱया बुलेट ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

508 किमीचा मार्गअसलेला हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून,ठाणे वाशी भागीतून 7 किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईहून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. 1.08 लाख कोटी रूपये खर्च असलेल्याट मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानने 88 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. यावेळी बोलताना जपानचे पंतप्रधा शिंजो आबे यांनी मोदींचे कौतुक केले. तसेच ‘दहा वर्षांपूर्वी मला भारताच्या संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे संबंध म्हणजे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा संगम आहेत. माझे मित्र पंतप्रधान मोदी हे दुरदृष्टी असलेले नेते असून बुलेट ट्रेनचे स्वप्न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपान आणि भारताचे अभियंते दिवस- रात्र मेहनत करतील या अभियंत्यांनी निश्च्यि केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही’,असे आबे यांनी म्हटले

 

Related posts: