|Sunday, April 22, 2018
You are here: Home » Top News » बुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा : देवेंद्र फडणवीस

बुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये करण्यात आले. ‘बुलेट ट्रेनचे भूमिपूजन अहमदाबादमध्ये होतो पण बुलेट ट्रेनचे उद्घाटन मोदींनी मुंबईत करावे’ असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी जपानचेही आभार मानले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीमुळे जपानने 30 हजार कोटी रूपये महाराष्ट्राला दिले त्यामुळे महाराष्ट्रात विकास प्रकल्प सुरू आहेत. भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. बुलेट ट्रेनच्या निमित्ताने नवभारताची मुहूर्तमेढ रोवली जात आहे , तसेच अहमदाबादमध्ये आज बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू आहे. बुलेट ट्रेनमुळे देशाला फायदा होईलच पण महाराष्ट्र आणि गुजरातला फायदा होईल. यामुळे रोजगार निर्मिती होईल’, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

Related posts: