|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱया 15 ते 20 महिल्या ताब्यात

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱया 15 ते 20 महिल्या ताब्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकलमध्ये जागेसाठी गुंडगिरी करणाऱया मुजोर महिलांवर जीआरपी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवलीतील बुधवारी एका महिलेला ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणाप्रकरणी आज जिआरपीने सापळा रचून तब्बल 15 ते 20 महिलांना ताब्यात घेतले आहे.

काल डोंबिवलीमध्ये लोकलमध्ये चढलेल्या एका महिलेला काही महिला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी लोकलच्या डब्यांमध्ये घुसून कोन्बिंग ऑपरेशन करत 15 ते 20 महिलांना अटक केली. बऱयाचदा लोकल ट्रेनमध्ये जागेवरून वादावादी होते. अनेकदा प्रवासी आपल्या गुपमधील लोकांनाच बसण्यास प्राधान्य देतात आणि त्यामुळे वाद होतात. अशा घटनांमध्ये गेले काही दिवसात बरीच वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून महिलांना ताब्यात घेतले.

 

Related posts: