|Saturday, January 20, 2018
You are here: Home » Top News » बीएमसीकडून लालबागचा राजा मंडळाला 4.86लाखांचा दंड

बीएमसीकडून लालबागचा राजा मंडळाला 4.86लाखांचा दंड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लालबागचा राज गणेश मंडळाला मुंबई महापालिकेने 4 लाख 86 हजारांचे दंड ठोठावून मोठा दणका दिला आहे. गणेशोत्ह काळात रस्तयांवर खड्डे खोदल्यामुळे हा दंड ठोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लालबाग परिसरात रस्त्यावर 243 खड्डे खोदल्यामुळे एफ दक्षिण विभागातले ही कारवाई केली आहे. प्रत्येक खड्डयासाठी 2 रूपये यानुसार हा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईकर आधीच पावसामुळे झालेल्या खड्डयांमुळे त्रस्त झालेले असताना दुसरीकडे लालबागचा राजा मंडळाने रस्त्यावर खड्डे खोदून यात आणखी भर घातली आहे.त्यामुळेच त्यांच्यावर पालिकेच्या वतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

Related posts: