|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » श्रीराम ऑटोमॉलचे रत्नागिरीत केंद्र सुरू

श्रीराम ऑटोमॉलचे रत्नागिरीत केंद्र सुरू 

रत्नागिरी / वृत्तसंस्था :

प्री ओन्ड वाहन आणि उपकरणांचे सेवा देणाऱया श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेडने रत्नागिरीमध्ये आपले केंद्र सुरू केले. कंपनीचे हे देशभरातील 69 वे केंद्र असून मुंबई परिसरातील कंपनीचे सातवे केंद्र आहे. रत्नागिरी-मुंबई महामार्गावर असलेल्या वाहतूकदार, कंत्राटदार, वितरक, उत्पादक आणि वैयक्तिक खरेदीदारांच्या प्री ओन्ड वाहने आणि उपकरणेविषयक सर्व गरजा पूर्ण करण्यात येतील. मुंबई, रत्नागिरी, गोवा, चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे परिसरातील ग्राहकांना श्रीराम ऑटोमॉलच्या सेवेचा लाभ घेता येईल.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीद्वारे पारंपरिक आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करण्यात येतो. रत्नागिरी ऑटोमॉलमध्ये लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी 75 वापरलेली वाहने आणि बांधकाम उपकरणांचा समावेश होता. एकाच दिवसात 57 वाहने आणि उपकरणांची विक्री करण्यात आली. या ऑटोमॉलमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांना एकाच छताखाली प्री ओन्ड वाहने व उपकरणे उपलब्ध केली जातील. रत्नागिरी आणि जवळपासच्या परिसरातील हजारो ग्राहकांना सेवा देण्यासाठीचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे सीईओ समीर मल्होत्रा यांनी म्हटले.