|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन करा : सुभाष देशमुख

सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन करा : सुभाष देशमुख 

पुणे / प्रतिनिधी :

राज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. काही संस्था अडचणीत असल्या, तरी या दोन वर्षांत नव्हे; तर आघाडी सरकारच्या काळातच त्यांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन अजित पवारांनीच करावे, असा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी येथे लगावला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, राज्यातील 22 हजार विकास संस्था बंद पडल्या आहेत. 350 खरेदी-विक्री संघापैकी निम्मेच संघ सुरू आहेत. 300 सूत गिरण्यापैंकी 90 टक्के गिरण्या बंद पडल्या आहेत. दूध संघ बंद पडले, सहकारी साखर कारखाने विकले गेले. काही कारखान्यांचे खासगीकरण करण्यात आले. या सर्व संस्था आमच्या काळातील नाहीत, तर आघाडी सरकारच्या काळातील आहेत. त्यामुळे राज्यातील सहकार कुणी अडचणीत आणला, याचा विचार अजित पवार यांनीच केला पाहिजे.

Related posts: