|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कोकरूड पोलीस अधिकाऱयांच्या निलंबनाची मागणी

कोकरूड पोलीस अधिकाऱयांच्या निलंबनाची मागणी 

कोकरुड वार्ताहर :

माळेवाडी येथील केरु महादेव जाधव (वय 80) यांना कोकरुड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या विश्वानंद उद्यानात गुरे चारण्याच्या कारणावरून ए. पी. आय. भगवानराव शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आज कोकरुड येथे बंद पाळण्यात आला. जोपर्यंत सपोनि भगवान शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको करणार अशी भूमिका
ग्रामस्थांनी घेतली. यावेळी झालेल्या आंदोलनातील 25 ते 30 स्त्राr-पुरुषांना  पोलिसांनी ताब्यात घेतले. दंगल नियंत्रण विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना रात्री सोडून देण्यात आले.

माळेवाड़ी येथील केरु महादेव जाधव हे काल दि.13 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या शेजारील असणाऱया माळावर जनावरे चरावयास घेऊन गेले होते. ते दोन पोलिसांनी पहिले आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांना कल्पना दिली. यावेळी शिंदे यांनी केरु जाधव यांना बोलावून घेतले व जाधव यांना दोन थप्पड लगावल्या होत्या. यात ते बेशुद्ध झाले होते. ही बातमी ग्रामस्थांना समजली. त्यांनी धाव घेत पोलीस स्टेशनकडे जावून चौकशी केली असता जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केली असल्याचे नक्की झाल्याने ग्रामस्थांनी भगवान शिंदे यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून निलंबन करावे, यासाठी गुरूवारी कोकरुड, माळेवाड़ी येथे बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही गावचे ग्रामस्थ सकाळी 10 वाजता निनाई मंदिर येथे एकत्र जमून कोकरुड फाटा येथे जमा झाले व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास देशमुख म्हणाले, या पोलीस स्टेशनकडून येथील भगवान शिंदे यांनी युवक, महिला पुरुष व सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे. शेतकरी सर्व सामान्य यांना वेठीस धरुन कंपनीना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे. माजी सरपंच संजय जाधव म्हणाले, प्रत्येक सणाला लोकांना अडवून पैसे उकळले जातात. संजय घोडे म्हणाले, कायदा सर्वांसाठी एकच असून शिंदे ना मारण्याचा हक्क नाही. पंधरा दिवसापूर्वी चौगुले कुटुंबीयातील दोन महिलांना अशीच शिवीगाळ करत विवस्त्र करून मारण्याची धमकी दिली होती. अनिल घोडे म्हणाले, शिंदे हे बार, मटका, गुटखा, टॅव्हल्स यांच्याकडून हप्ते घेत आहेत. गणपतीला नाचाणाऱयावर कारवाई करणाऱया पोलिसांनी स्वतः डीजेच्या तालावर ठेका का धरला त्यांना कायदा नाही का? असा सवाल केला.

Related posts: