|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तमनाकवाडय़ात सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

तमनाकवाडय़ात सर्पदंशाने बालकाचा मृत्यू 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी

तमनाकवाडा (ता. कागल) येथील शिवराज शरद कसलकर (वय 6) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. निपाणी येथील खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होता. परंतु शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली.

याबाबत मिळालेली माहिती अशी : शिवराज येथील प्राथमिक शाळेत 1 लीच्या वर्गात शिकत होता. आजारी असलेने तो घरीच होता. दुपारी घराजवळ खेळत असताना त्याच्या पायाला काहीतरी खरचटले होते. कोणालाच काही समजले नसल्याने सायंकाळपर्यत दुर्लक्ष झाले. सायंकाळी त्याला निपाणी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. तेथे विषारी सापाचा दंश झाल्याचे सिद्ध झाले.  

शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कसलकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. त्याच्या पश्चात आई, वडिल, आजी, आजोबा, एक लहान भाऊ असा परिवार आहे.

Related posts: