‘जमाना बदलल्याचं चिन्ह, दुसरं काय’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

प्रतिनिधी/ पणजी
जिथे संवेदनशीलता आहे तिथेच कविता निर्माण होत असते, प्रकाश क्षीरसागर यांनी जमाना बदलल्याचं चिन्ह, दुसरं काय या काव्यसंग्रहातून झाडाचं उदाहरण घेऊन आजच्या जमान्यातील माणसांवर भाष्य केले आहे. संवेदनशील भवनातून व एकदम बोलक्या स्थितीत त्यांच्या या कविता आहे, असे कवियत्री अरुणा गाणू यांनी सांगितले.
पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये गोमंतकीय साहीत्यीक प्रकाश रामचंद क्षीरसागर यांच्या ‘जमाना बदलण्याची चिन्हे, दुसरं काय’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अरुणा गाणू बोलत होत्या त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जेष्ठ साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, अंनत जोशी, कृष्णा कुलकर्णी, प्रकाश क्षीरसागर व चित्रा क्षीरसागर उपस्थित होत्या.
झाडे, शेती, निसर्ग या बरोबरच स्त्री जाणिवांच्या कवितांचा त्यांच्या या काव्यसंग्रहात प्रभाव दिसून येतो. संवेदनशीलता कवितामध्ये तेवढीच महत्वाची असते. या काव्यसंग्रहात ती हमखास दिसून येते. असे कृष्णा कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रकाश क्षीरसागर हळूवार मनाचे कवी असून त्याच्या आजुबाजूला घडणारे विषय त्यांच्या कवितामध्ये आहे. समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. हे त्यांच्या या कवितांमध्ये दिसून येत आहे, असे ऍड. रमाकांत खलप यांनी सांगितले.
माधव राघव प्रकाशन, गोमंतक साहित्य सेवक मंडळ व गोमंतक साहित्यिक पत्रकार संघ यांनी हा काव्यप्रकाशनचा सोहळा आयोजित केला होता. येथे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.