|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पूर्वी भावेचा नफत्याविष्कार

पूर्वी भावेचा नफत्याविष्कार 

सूत्रसंचालक, डान्सर आणि अभिनेत्री अशी तिहेरी रूपं अत्यंत सहजरित्या हाताळणाऱया पूर्वी भावेला सगळेच ओळखतात. लहानपणापासूनच कलाक्षेत्रात काहीतरी करून दाखवायची जिद्द असणाऱया पूर्वीने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती सूत्रसंचालन आणि अनेक नाटकांमध्ये काम करून उत्तम कलाकार म्हणून नावारूपास आली. भरतनाटय़म संपूर्णपणे आत्मसात करून ती एक उत्तम डान्सर आहे हेही तिने दाखवून दिले आहे. डॉ. संध्या पुरेचा ह्या तिच्या गुरु आहेत. भरतनाटय़मच संपूर्ण शिक्षण तिने तिच्या गुरूंकडून घेतलं. विशेष म्हणजे त्यातील एक विशिष्ट नफत्य प्रकार असलेले मार्गम ह्याचे धडे तिने घेतले. नुकतंच मार्गम लोकांपर्यंत पोहचावा आणि ते नक्की काय आहे हे लोकांना कळावं म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात पूर्वीने हे मार्गम नफत्य करून लोकांना त्याचे वैशीष्टय़ आणि त्यातील विविधता समजवून दिली. सध्याच्या काळात सगळेच पाश्चिमात्य डान्सकडे वळत असताना पूर्वीने मात्र आपल्या मातफभूमीतील नफत्य स्वीकारण्याचा निर्णय घेऊन आजच्या युवा पिढी समोर एक आदर्श मांडला आहे. तिच्या मते आपल्या देशात विविध नफत्य प्रकार आहेत जे आपणच जोपासायला हवे. मार्गम या पूर्वीच्या नफत्याविष्कारमुळे तिचा हा वेगळा पैलू देखील प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांना ती सूत्रसंचालक, अभिनेत्री इतकीच एक नफत्यांगणा म्हणून देखील भावली यात शंकाच नाही.

Related posts: