|Friday, April 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तेथे देवची होऊनि ठेलो

तेथे देवची होऊनि ठेलो 

मनातील आकर्षणाच्या नियमाबाबत जॉन असाराफ म्हणतात-तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता-आकर्षित करता. बॉब प्रॉक्टर म्हणतात-जी गोष्ट तुम्ही तुमच्या मन:चक्षूंनी पाहता, ती तुमच्या हातात येणार असते. तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा. तो तुमचा प्रबळ विचार बनवा. आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. माईक डूली म्हणतात-थोडक्मयात आकर्षणाचा हा सिद्धान्त तीन सोप्या शब्दात सांगणे सहज शक्मय आहे. विचार वस्तू बनतात! विचारांना अस्तित्व येतं! याच सामर्थ्यशाली सिद्धान्तामुळं तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले. हे तत्त्व स्वतःला पुनः पुन्हा सांगत रहा. तुमच्या मनात – अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे. तुमचे विचारच साकार झाले. मनाचा हा आकर्षणाचा नियम भगवत् भक्तांनी कळत नकळत उपयोगात आणला काय? आपण पाहतो की तुकाराम महाराज म्हणतात – देव पहावयाला गेलो ।  तेथे देवची होऊनि ठेलो ।। हे तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडलं, हा त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच ते म्हणू शकतात – आता कोठे धावे मन ।  तुमचे चरण देखलिया ।। भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंदु ।। हा देव पाहताच देव झाल्याचा दृष्य परिणाम आहे. आणखी एका अभंगातून तुकाराम महाराज आपली अनुभूती व्यक्त करतात. आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचे ।।

तुम्ही आम्ही शेकडो वेळा पंढरीला गेलो असू, पंढरीच्या राऊळात गेलो असू, पंढरीनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेतले असेल, त्याच्या पायावर आपले मस्तक ठेवले असेल. पण प्रामाणिकपणे सांगा, तुकाराम महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव आपल्याला कधी आला काय? खरे सांगायचे तर आपल्याला आजवर देव दर्शन झालेलेच नाही. याचे कारण काय? मनाच्या आकर्षणाचा नियम! आपण आपल्या मनात ज्या गोष्टींचे चिंतन करतो त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो. आपण मनात कधी भगवंताचे चिंतन करतच नाही. आपली पावले पंढरीची वाट चालत असतात, पण मनात मात्र धन, वित्त, गोत, संसार याचेच चिंतन चालू असते. तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्था मात्र कशी होती? संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा।। एका अभंगात त्या विठूरायाच्या भेटीची आर्तता व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात – कन्या सासुऱयासी जाये। मागे परतोनी पाहे ।। तैसे झाले माझ्या जीवा ।  केव्हा भेटसी केशवा ।।  चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ।।

जीवनावेगळी मासोळी ।  तैसा तुका तळमळी ।।

तुकाराम महाराजांचे मन रात्रंदिवस एकच उद्योग करत होते – दिन रजनी हाची धंदा । गोविंदाचे पवाडे।। त्यांच्या मनात एकच विषय व्यापून राहिला होता –

विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जन धन माता पिता ।।

Related posts: