|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत तिवारींनी वापरले अपशब्द

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत तिवारींनी वापरले अपशब्द 

नवी दिल्ली

: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 67 व्या वर्षात पदार्पण पेले. यानिमित्त त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी ते गुजरातपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याचदरम्यान काँग्रेस नेत्यांनी मोदींवर कठोर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवले. पक्षाचे महासचिव दिग्विजय सिंग यांच्या मागोमाग आता मनिष तिवारींनी मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. तिवारींनी ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख करत आक्षेपार्ह शब्द लिहिले. महात्मा देखील मोदींना देशभक्ती शिकवू शकत नाही असा दावाही त्यांनी ट्विटद्वारे केला. याअगोदर 8 सप्टेंबर रोजी दिग्विजय सिंग यांनी ट्विट केला होता. यात मोदी आणि त्यांच्या अनुयायांना कथितरित्या ‘भक्त’ संबोधिण्यात येत त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दाचा वापर करण्यात आला होता. या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षाने या ट्विटपासून फारकत घेत जबाबदारी दिग्विजय सिंग यांच्यावर ढकलली होती. वादानंतर दिग्विजय यांनी माफी मागितली होती. तिवारींनी देखील माफी मागितल्याची माहिती समोर आली असून त्याची पुष्टी मिळालेली नाही.

Related posts: