|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अर्थव शिंदे जलतरणपटू याचा अंत विधि

अर्थव शिंदे जलतरणपटू याचा अंत विधि 

वार्ताहर/ कुडाळ

वर्धा येथे जलतरण स्पर्धेसाठी निघालेला जावलीच्या हुमगाव येथील जाबाज 14 वर्षीय जलतरणपटू अर्थव मिलिंद शिंदेला सोमवारी हुमगाव येथील निरंजना नदीच्या तीरी भावपूर्ण वातावरणात अंततात विलीन झाला. 

सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास पिता डॉ. मिलिंद शिंदे यांनी अर्थवच्या चितेस मुखाग्नी दिला. 

  यावेळी आमदार शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुंरे, ऋषिकांत शिंदे या सह जावळी सातारा, मुबई, पुणे विभागातून आलेले हजारो शिंदे घराण्यावर प्रेम करणारे व सातारा शहरातून आलेल्या शेकडो खेळाडू धावपटू, यानि जलतरण पटू अर्थव शिंदे ला अखेरची श्रध्दांजली वाहिली. 

  आज दुपारी 2 च्या सुमारास अर्थव शिंदे यांचा मृतदेह हुमगाव येथे आणण्यात आला काल दुपारपासूनच अपघातात अर्थव शिंदे यांचा अंत झाल्याची बातमी पसरताच सोशल मीडिया सह गावागावात अर्थव शिंदे ला श्रद्धांजली दिली जात होती आज दुपारी हुमगाव गावात अर्थव शिंदे यांना अखेर चा निरोप देण्यासाठी जावलीतील नागरिकांनी एकच गर्दी केली फुलांच्या सजवलेल्या रथातून अर्थव ची अंत्ययात्रा काढण्यात आली अमर रहे अमर रहे च्या घोषणा   हि युवकांकडून देण्यात येत होत्या रुग्णवाहिकेतून पार्थिव हुमगाव हायस्कुल येथे आणण्यात आले तीथुन सजवलेल्या ट्रक्टर मधून अथर्व ची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी शाळेतील विध्यार्थी  

  सहभागी झाले होते अमर रहे अमर रहे च्या जयघोषात अथर्व चे  पार्थिव त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले त्यानंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठी हुमगावसह जावळी तलीक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी अथर्व च्या कुटुंबीय चा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या आईने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांची तर अक्षरशः मने हेलावून टाकली यावेळी अथर्वचे चुलत आजोबा म्हणजे आमदार शशिकांत शिंदे तसेच माथाडी नेते ऋषिकांत शिंदे यांनाही अश्रू अनावर झाले 

या दुःखद घटनेने सम्पूर्ण गावावर शोककळा पसरली

यावेळी अर्थव शिंदे या छोठय़ा जलतरण पटू ने अवघ्या 14 वर्षाच्या आयुत अनेक रेकीर्ड ब्रेक केल्याचे अनेक किस्से हुमगाव मध्ये बोलले जात होते.

Related posts: