|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » Top News » दिवाळी पर्यंत कमी होणार पेट्रोल- डिझेलचे दर : पेट्रोलियम मंत्रालय

दिवाळी पर्यंत कमी होणार पेट्रोल- डिझेलचे दर : पेट्रोलियम मंत्रालय 

ऑनलाईन टीम / अमृतसर :

पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद प्रधान यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारच्या दररोज पेट्रोलचे दर निश्चित करण्याच्या निर्णयाचा विरोधी पक्ष सुरूवातीपासून विरोध करत आहेत. हा निर्णय घेतल्यापासून पेट्रोल- डिझेलचे भाव वाढत असल्याची विरोधी पक्षांची तक्रार आहे. अमृतसरच्या दौऱयावर असणाऱया पेटोलियम मंत्री प्रधान यांनी दिवाळीपर्यंत इधानच्या दरात कपात होईल असे संकेत दिले आहेत. प्रधान यांना अलिकडेच कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाच्या उत्पादनात 13 टक्क्यांनी घट झाली आहे, परिणामी रिफायनरी तेलाचे भाव वाढल्याची माहिती प्रधान यांनी दिली.

 

Related posts: