|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » भाजपने माझ्या हत्येचा कट आखला होता ; मायवतींचा आरोप

भाजपने माझ्या हत्येचा कट आखला होता ; मायवतींचा आरोप 

ऑनलाईन टीम / मेरठ :

बहुजन समाज पक्षाच्या आध्यक्ष मायवतींनी भाजपावर हल्लाबेल करत भाजपने ‘माझ्या हत्येचा कट आखला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. सहानपुरमधील हिंसा भाजपनेच घडवल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सोमवारी मेरठमध्ये त्या बोलत होत्या. ‘महाराणा प्रताप जयंतीच्या वेळी हत्येचा कट आखला होता. या कार्यक्रमात फुलन देवी यांचा मारेकरी शेर सिंह राणा हा देखील होता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मायावती सहानपूरमध्ये येतीलच त्यावेळी हिंसेदरम्यान हत्या करायची असा कट होता. पण त्यांच्या कटाबाबत आधीच माहिती मिळाली आणि त्यांचा कट उधळला’, असे मायावती म्हणाल्या. दलितांवरील अत्याचाराबाबत बोलू न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

 

Related posts: