|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » केंद्र सरकार आणणार एनएचएआयचा आयपीओ

केंद्र सरकार आणणार एनएचएआयचा आयपीओ 

मुंबई

 केंद्रीय  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) आणण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. सध्या यासंबंधी योजनेवर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   एनएचएआयच्या आयपीओसाठी प्रक्रिया सुरू आहे. याबाबत आपण गांभीर्याने विचार करत आहोत. परंतु यासाठी अर्थ मंत्रालयाची सहमती मिळवणेही आवश्यक असल्याचे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र त्यांनी हा आयपीओ कधीपर्यंत आणण्यात येईल याबाबत भाष्य केले नाही. इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी एनएचआयच्या सूचीबद्धतेसंबंधी उल्लेख केला. याद्वारे गुंतवणूकदारांकडून 10,000 अब्ज रुपयांपर्यंत   बोली प्राप्त होणे सरकारला अपेक्षित आहे.