|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘तो’ खड्डा जीव गेल्यावर बुजवणार का?

‘तो’ खड्डा जीव गेल्यावर बुजवणार का? 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर हे पेन्शनर सिटी म्हणून ओळखले जाते. परंतु, या पेन्शनरांच्या सिटीत एक ना धड भाराभर खड्डे रस्त्यांना पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. साताऱयात गेल्या सात महिन्यांपासून जुना आरटीओ ऑफीस चौकात मोठा खड्डा असून हा खड्डा कोणाचा तरी जीव घेतल्यावर प्रशासन बुजवणार आहे का?, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जावू लागला आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक रस्त्यावर असे खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे असे खड्डे बुजवणार की वाढवणार, असे कोडे सातारकरांना पडू लागले आहे.

  शहरातील प्रत्येक रस्त्यांची चाळण झाली असून प्रत्येक रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे सातारकरांना मणक्याबरोबर पाठींचे दुखणेही जडले आहे. तसेच शहरवासियांची दुचाकी, चारचाकी वाहनेही आजारी पडू लागली आहेत. मनोमीलनाच्या काळात शहरातील रस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यांची वाट लागली असून अनेक रस्त्यावर धोकादायकस्थितीत खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी जुना आरटीओ ऑफीस चौकात खड्डा जलवाहिनीला गळती लागल्याने पडला होता. त्यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख निमिष शहा यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केवळ गळती काढली. तात्पुरती काढलेली गळती पुन्हा लागली. ‘तरुण भारत’ने याबाबतचे सढळ वृत्त प्रसिद्ध करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने परत ती गळती काढली. दरम्यान, खड्डा मात्र तसाच आहे. याच रस्त्यावरुन लोणंद, फलटणसह मुंबईकडे जाणाऱया आणि मुंबईहून येणाऱया वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच शहरातील नागरिकही या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करतात. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे

Related posts: