|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले

कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले 

ऑनलाईन टीम / पाटण :

राज्यात कालपासून सुरू असलेल्या संततधर पावसामुळे राज्याततील अनेक धरणे हाऊसफुल्ल झाली आहेत. कोयना धरणक्षेत्रात कालपासून पावसाचा जोर वाढल्याने सकाळी सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्यात आली आहेत. 11397 क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पूर्वेकडील भागात संततधार पाऊस पडत असल्याने कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यातच आता धरणातून पाणी सोडल्याने कोयना नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासाने सतर्कतेचा इाा दिला आहे. 105 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सध्या एकूण 104.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातच धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात प्रतीसेकंद 35634 क्यूसेक पाण्याची आवक होत असल्याने बुधवारी सकाळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय आला आहे.