|Monday, September 24, 2018
You are here: Home » Top News » संघाच्या मंदिरास निधी दिल्याने न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

संघाच्या मंदिरास निधी दिल्याने न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरातील बांधकामासाठी एक कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरपालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

नागपूर महानगरपालिकेने पालिकेच्या तिजोरीतून संघाच्या स्मृती मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव महापालिकेने मंजूरही केला. त्यामुळे स्मृती मंदिरात संरक्षक भिंत बांधणे आणि इतर आवश्यक कामांसाठी एक कोटी 37 लाखांचा निधी महापालिकेकडून दिला जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी आरएसएस, नागपूर महानगरपालिका आणि राज्य सरकारला नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. तसेच यासंबंधित यंत्रणांनी 3 ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Related posts: