|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुर्गामाता दौडसाठी शहर सज्ज

दुर्गामाता दौडसाठी शहर सज्ज 

शहर परिसरासह ग्रामीण भागातही भव्य तयारी

प्रतिनिधी/ बेळगाव

आजच्या पिढीला देव, धर्म आणि देशासाठी लढण्याची प्रेरणा देणाऱया दुर्गामाता दौडला गुरुवार दि. 21 पासून सुरुवात होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दौडची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ज्या गल्ल्यांमधून दौड निघणार आहे, त्या गल्ल्यांमध्ये कार्यकर्त्यांनी देखावे, पताका, रांगोळय़ा तसेच सजीव देखावे उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

शहरातील दौडीची सण असल्याप्रमाणे तयारी केली जाते. त्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेत दौडचे नियोजन केले आहे. यासाठी गल्ल्यांमध्ये स्वच्छता करून दौडीच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पावसामुळे यावेळी काहीशी कार्यकर्त्यांत निराशा असली तरी हे सर्व अडथळे झुगारून उत्साह तसाच दिसून येत आहे.

दौडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच भगवे फेटे, झेंडे यामुळे दौडीचा मार्ग भगवामय झाला आहे. कार्यकर्त्यांनीही पांढरे सदरे, टोप्या, फेटे यांच्या खरेदीसाठी बुधवारी शहरातील दुकानांमध्ये गर्दी केली होती. दौडला शिवाजी उद्यानापासून गुरुवारी सकाळी सुरुवात होणार असून कपिलेश्वर मंदिरजवळ सांगता होणार आहे. दरम्यान, शहरात आता भगवे वादळ घोंघावणार आहे. महापौर संज्योत बांदेकर गुरुवारच्या दौडला उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारचा दौडचा मार्ग…

श्री शिवाजी कॉलनी टिळकवाडी, एम. जी. रोड, महर्षि रोड, नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, देशमुख रोड, मंगळवार पेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, हरी मंदिर, चिदंबरनगर, पानसे हॉटेल रोड, हारुगेरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हनुमाननगर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कपिलेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता होणार आहे.      

Related posts: