|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » वेंगसरकरची बीसीसीआयवर टीका

वेंगसरकरची बीसीसीआयवर टीका 

वृत्तसंस्था /मुंबई :

सध्या देशामध्ये पावसाळी हंगाम चालू असून बऱयाच ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असताना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका बीसीसीआयने ठेवल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार आणि प्रमुख निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी संघटनेच्या या गलथान कारभारावर टीका केली आहे.

मान्सूनचा हंगाम अद्याप देशात पूर्णपणे संपला नाही हे माहित असतानाही बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय वनडे मालिका कशी ठेवली याचे आश्चर्य वाटते. सध्याच्या या मालिकेत पावसाचा वारंवार अडथळा येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शौकिनांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचा खेळ पाहता येत नाही. बीसीसीआयच्या स्पर्धा नियोजन समितीने भविष्यकाळात अशी पुन्हा चूक होणार नाही याची दखल घ्यावी, असे वेंगसकर म्हणाले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील या वनडे मालिकेतील चेन्नई येथील पहिल्या सामन्यातही पावसाचा अडथळा आला होता. त्यानंतर भारताने हा सामना डकवर्थ लेविस नियमानुसार जिंकून मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर कोलकात्याच्या सामन्यातही पावसाळी वातावरण राहील, असे हवामान खात्याने यापूर्वीच सांगितले होते. सप्टेंबर महिन्यात कोणतीही मालिका ठेवताना वातावरणाचा विचार करणे जरूरीचे आहे, असेही ते म्हणाले. पुढील वर्षीच्या जानेवारीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणार आहे. 2017-18 च्या रणजी क्रिकेट हंगामाला 6 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असल्याचे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे. तथापि रणजी हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये यापूर्वी सुरू होत असे. यावेळी रणजी स्पर्धेतही पावसाचा अडथळा येण्याची शक्यता असल्याने वेंगसरकर यांनी बीसीसीआयच्या स्पर्धा वेळापत्रक समितीला दोष दिला आहे.  

Related posts: