|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इम्रान खानच्या कार्यालयावर एसअयटीचा छापा

इम्रान खानच्या कार्यालयावर एसअयटीचा छापा 

प्रतिनिधी /पणजी :

खाण घोटाळा प्रकरणात अटक करून नंतर जामिनावर सुटलेला इम्रान खान याच्या फातोर्डा येथील कार्यालयावर एसआयटीने काल गुरुवारी छापा टाकला. त्याच्या कार्यालयातून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

संशयित इम्रान खान याने बेकायदेशीररित्या कोटय़वधी रुपयांचे खनिज निर्यात करून सरकारचा महसूल बुडविला असल्याचे एसआयटीच्या निदर्शनास आले आहे. म्हणून एसआयटीने लगेच कारवाई करून मंगळवार 12 सप्टेंबर रोजी इम्रान खान याला अटक केली होती. नंतर काही दिवसांनी खान याची जामिनावर सुटका झाली.

राज्यातील खाण घोटाळा प्रकरणासंदर्भात तपासकाम करण्यासाठी सरकारने गुन्हा अन्वेषण विभागात खास पथकाची नियुक्ती केली असून त्यांनी ही कारवाई केली आहे. संशयित इम्रान खान याचे अनेक राजकारण्यांशी लागेबंधे असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचा प्रतिनिधी म्हणून तो काम करीत होता. अशी माहिती पोलासंना मिळाली आहे. मात्र याबाबत कामत यांनी नकार दिला असून इम्रान खान या व्यक्तीला आपण ओळखतही नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts: