|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » मराठी दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट ऑस्करच्या यादीत

मराठी दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट ऑस्करच्या यादीत 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मराठी दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा ‘न्यूटन’हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे.

‘न्यूटन’मधून देशातील राजकारणावर उपरोधक भाष्य करण्यात आला आहे. नूतन कुमार हा दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी आपले नाव न्यूटन असे लिहतो आणि पुढे याच नावाने ओळखला जातो. त्याने भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर, त्याला नक्षलग्रस्त् भागात निवडणूक अधिकारी म्हणून जावे लागते. ज्या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाला, त्याच दिवशी या सिनेमाची ऑस्करसाठी निवड व्हावी, हा दुग्धशर्करा योगच आहे, अशी भावना दिग्दर्शक अमित मसूरकरने व्यक्त केली.