|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » शरद पवार एनडीएसोबत ; आठवलेंचा दावा

शरद पवार एनडीएसोबत ; आठवलेंचा दावा 

ऑनलाईन टीम / अमरावती

केंदात आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी आहे. जर शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपचे सरकार पडत नाही. शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी केला.

अमरावती येथे महापालिकाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहिताचे निर्णय घेत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, जनधन योजना यांसह अनेक विविध योजना त्यांनी अमलात आणल्या. तसेच आठवले यांनी मराठा आरक्षणावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिकेत आहे. मराठय़ांना आरक्षण द्यावे, ही अगोदरपासून आरपीआयची मागणी आहे.

दरम्यान, अधिकारी, कर्मचाऱयांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कोणत्याही कर्मचाऱयांना अन्याय होणार याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाहीही आठवले यांनी यावेळी दिली.

Related posts: