|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दोघांवर कोयत्याने वार करणारा युवक दहा मिनिटात जेरबंद

दोघांवर कोयत्याने वार करणारा युवक दहा मिनिटात जेरबंद 

प्रतिनिधी/ सातारा

रामाच्या गोटात क्षीरसागरवाडय़ाजवळ सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या हातात कोयता होता. त्याचा रुद्र अवतार पाहून नागरिकही भयभित झाले होते. त्याने कोयत्याने एका महिलेवर आणि युवकावर वार करुन जखमीही केले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच शाहुपूरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून किरण मारुती जाधव (वय 32, रा. आदर्शनगर पाली, ता. कराड) याला दहाव्या मिनिटातच अटक केली. त्याला अटक केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, क्षीरसागरवाडा येथे कृष्णात मारुती निकम हे आपल्या कुटुंबासह राहतात. सकाळी 8.30च्या सुमारास किरण जाधव हा हातात कोयता घेवुन आला. त्याने प्रेम संबंधाला विरोध करत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत थेट मंगल सुनील सपकाळ व महादेव सुनील सपकाळ यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्यामध्ये मंगल यांच्या डोक्यास कपाळाजवळ तर महादेव यांच्या डोक्यात कपाळाजवळ, हाताच्या करंगळी व त्या शेजारच्या बोटावर, उजव्या अंगठय़ावर जखमा झाल्या. या प्रकाराने नागरिकही भयभीत झाले. पोलिसांना फोन केल्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहचले. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हवालदार विश्वनाथ मेचकर, धनंजय कुंभार, गोपनियचे सहाय्यक फौजदार मापारी, हवालदार सुनील पवार यांनी कोयत्यासह अटक केली. त्याच्यावर भा.द.वि.स 326 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ए.एस.ससाणे तपास करत आहेत.

Related posts: