|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मायणीत तृतीय पंथियाची गळा चिरून हत्या

मायणीत तृतीय पंथियाची गळा चिरून हत्या 

प्रतिनिधी/ वडूज

मायणी (ता. खटाव) येथील फुलेनगर रस्त्यालगत हरिश बबन साठे उर्फ दादा (वय 29) या तृतीयपंथी तरुणाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापुराव महादेव पाटोळे, गणेश आप्पा पाटोळे या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

            पोलीससूत्र व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी फुलेनगर रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी करणाऱया नागरिकांना चांद नदीच्या कडेला अंगावर साडी असलेली व्यक्ती रस्त्याच्या कडेला असणाऱया गवतामध्ये निपचिप पडलेली आढळली. ही घटना पाहणाऱया व्यक्तीने पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. त्वरित घटनास्थळी पोलीस दाखल होत त्यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली असता दादा उर्फ हरिश बबन साठे असल्याचे समोर आले. तसेच ही व्यक्ती तृतीय पंथीय असल्याचेही समजते.

            पोलिसांनी तातडीने तपासकार्य सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. या घटनेची वार्ता मायणी व परिसरात पसरल्याने लोकांनी या घटनास्थळी धाव घेतल्याने बघ्यांची मोठी गर्दी  झाली होती. मृत व्यक्ती मातंग समाजाची असल्याने येथील या समाजाच्या संघटनांनी तातडीने एकत्र येऊन मोठय़ा संख्येने युवक व नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन या घटनेचा निषेध केला. व संशयित आरोपींना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

            मोठय़ा प्रमाणावर जमाव जमल्याने मायणी पोलीस दूरक्षेत्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु उपस्थित जमावस सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी शांततेचे आवाहन करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे व पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी भेट देवून परस्थितीची पाहणी केली.

Related posts: