|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आनेवाडी येथे महामार्गावर अपघातात 1 ठार,1जखमी

आनेवाडी येथे महामार्गावर अपघातात 1 ठार,1जखमी 

वार्ताहर/ आनेवाडी

आशियाई महामार्गावर आनेवाड़ी गावच्या हद्दीवर असणाया थोरला नावाच्या पुलावर दुचाकी आणि आयशर टेम्पोच्या धड़केत झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाला असून अपघातानंतर आयशर टेम्पो च्या चालकाने धडक देऊन घटनास्थळावरुन गाड़ीसह पलायन केले

     आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीजवळ असणाया या पुलावर सकाळी सव्वा नऊ च्या सुमारास सातारा येथील राजा पावसकर व अवधूत पवार हे स्वतःची प्लेजर दुचाकी(एमएच11एई9483) या विरमाडे ता वाई येथे फैब्रिकेशन च्या कामासाठी निघाले होते आनेवाडीच्या पुलावर आल्यानंतर पाठीमागुन भरधाव आलेल्या आयशर टेम्पो ने त्यांना  धडक दिली त्यामुळे ते पुलाच्या कठडय़ाला जोरात धडकले त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये राजा पावसकर(58) रा. विघ्नहर्ता कॉलनी कोंडवे सातारा हे जागीच ठार झाले,तर अवधूत विठ्ठल पवार(57) हे जखमी झाले,अपघात एवढा भीषण होता कि पावसकर यांच्या मेंदुच्या संपुर्ण भागाची अवस्था छिन्न विछिन्न अशी झाली होती ,अपघाताची नोंद भुइंज पोलिस स्टेशन झाली असून पुढील तपास चालु आहे

 

 

Related posts: