|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नरबळीचा प्रयत्न करणाऱया महिलांची कारागृहात रवानगी

नरबळीचा प्रयत्न करणाऱया महिलांची कारागृहात रवानगी 

प्रतिनिधी / बेळगाव

नरबळीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन गुरुवारी मार्केट पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सिरीन यासिन जमादार (वय 38, रा. गांधीनगर), मासाबी उर्फ पप्पी मुल्ला (वय 45, रा. तिसरा क्रॉस, वीरभद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी अटकेची कारवाई पूर्ण करुन रात्री त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर करण्यात आले.

18 सप्टेंबर रोजी दुपारी मासाबी आपण राहत असलेल्या भडकल गल्ली येथील भाडय़ाच्या घरात खड्डा खणून घरमालकाच्या मुलीचा बळी देण्याचा त्यांचा कट होता. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने बळी रोखण्यात यश आले. सध्या या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 

Related posts: