|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मुंबई – गुजरात रेल्वे मार्ग ठप्प

मुंबई – गुजरात रेल्वे मार्ग ठप्प 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. स्लपीर बदलायला उशीर झाल्याने वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बाईसर , डहाणू, वापीला जाणाऱया प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतूक दीड तास उशिराने सुरू आहे.

पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाच्या 118 नंबर वरील भागात देखभाल दुरूस्तीसाठी शुक्रवारी उशिरा रात्री 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जाणाऱया रेल्वे रूळाचे व स्लीपरचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम वेळीच पूर्ण न झाल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱया ट्रकवर गाडय़ांच्या लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून गुजरातला जाणाऱया आणि येणाऱया सर्व गाडय़ा ठप्प झाल्या आहेत. या खोळंब्यामुळे गुजरातला जाणाऱया गाडय़ा दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत. काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा उशिराने धावत आहेत. परिणामी चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

 

Related posts: