|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तानातून धमक्या ; दमानियांचा दावा

खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तानातून धमक्या ; दमानियांचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केला.

काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनानंतर खडसेंवर वाकोला पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दमानिया यांनी खडसेंविरोधातील खटले मागे घ्यावेत, यासाठी आपल्याला पाकिस्तानातून धमकीचा फोन आला होता. आपल्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. हा धमकीचा फोन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. याबाबतचा स्क्रीनशॉटच त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला.

Related posts: