|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर कोरियाला इंधन निर्यात बंद : चीन

उत्तर कोरियाला इंधन निर्यात बंद : चीन 

शांघाय

 उत्तर कोरियाच्या सततच्या आण्विक चाचण्यांमुळे त्याच्यावर संयुक्त राष्ट्राकडून निर्बंध लादण्यात आले. या पार्श्वभूमीवर चीनने या प्रस्तावाचे पालन करत पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात उत्तर कोरियाला करणार नाही असे स्पष्ट केले. तसेच उत्तर कोरियाकडून वत्त आणि कोळशाच्या आयातीवर देखील अंकुश लावला जाईल.  चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने वेबसाईटवर एक वक्तव्य प्रसिद्ध करत याची माहिती दिली.

पेट्रोलियम उत्पादनांसह नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर चीन निर्बंध लादणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांद्वारे उत्तर कोरियाच्या उत्पन्नाचे स्रोत गोठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्बंधांमध्ये उत्तर कोरियाकडून वस्त्रांच्या निर्यातीला बंदी घालण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर उत्तर कोरिया आता निर्धारित कालावधीपर्यंतच कच्चे तेल आयात करू शकेल. निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने तयार केला असून चीन आणि रशियासमवेत 15 सदस्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

Related posts: