|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल 

राजापुरातील गोवळ येथील कारवाई

वैद्यकीय परवाना नसतानाही उपचार

मुदतबाहय़ औषधांचा रूग्णांवर वापर

सभापतींच्या जागरूकतेमुळे पर्दाफाश

वार्ताहर /राजापूर

तालुक्यातील गोवळ येथील सुनील गुंडाप्पा खोत या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हा डॉक्टर मुदतबाहय़ औषध्ये रूग्णांना देत असलयाबाबतच पर्दाफाश पंचायत समिती सभापती सुभाष गुरव यांनी केला होता. त्यानंतर तपासणी केली असता त्याच्याकडे ऍलोपेथी सेवेसाठीचा वैद्यकीय परवानाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजापूर तालुक्यातील गोवळ गावी एक खासगी डॉक्टर मुदत टळून गेलेली औषधे रूग्णांना देत असल्याची माहिती येथील काहीजणांकडून सभापती सुभाष गुरव यांना मिळाली होती. या बाबत सभापती गुरव यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना यामध्ये तथ्य असल्याचे जाणवले होते. त्यामुळे सभापती गुरव यांनी शुक्रवारी तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह डॉक्टरच्या दवाखान्यात धडक देत डॉक्टरला मुदतबाहय़ औषधे देताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर संबंधित डॉक्टरच्याविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील गुंडाप्पा खोत असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय परवाना, ऍलोपॅथिक वैद्यकीय व्यवसाय परवाना नसताना लोकांना ते असल्याचे भासवून ऍलोपॅथिक औषध साठा जवळ बाळगला होता. तसेच मुदतबाहय़ औषधे विक्री करत होता. याबद्दल खोत याच्याविरोधात राजापूर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 1860, 419, 420 व महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 33, 2 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामसिंग पाटील करत आहेत.

Related posts: