|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर कोरियात 3.4 तीव्रतेचा भूकंपआण्विक चाचणी घेतल्याचा संशय

उत्तर कोरियात 3.4 तीव्रतेचा भूकंपआण्विक चाचणी घेतल्याचा संशय 

बीजिंग

:उत्तर कोरियात 3.4 तीव्रतेचा भूकंप नोंदला गेला. वृत्तसंस्थेने ही माहिती चीनच्या भूकंप विषयक विभागाच्या हवाल्याने दिली. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने पुन्हा आण्विक चाचणी करविल्याचे मानले जात आहे.  शुक्रवारीच त्या देशाच्या विदेश मंत्र्यांनी पुन्हा हायड्रोजन बॉम्ब चाचणी घेण्याचा संकेत दिला होता.उत्तर कोरियात सप्टेंबरच्या प्रारंभी 6.3 तीव्रतेचा भूंकप आला होता. तेव्हा अत्याधिक तीव्रतेची चाचणी उत्तर कोरियाने घेतल्याचे अनुमान तेव्हा जगभरातून व्यक्त झाले होते. नंतर तेथील सरकारी प्रसारमाध्यमांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आल्याची पुष्टी दिली होती.प्रशांत महासागरात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल.

किम जोंग-उन यांच्या आदेशानंतरच कारवाई केली जाणार असल्याने सध्या त्याविषयी सांगता येत नाही. ट्रम्प यांच्या धमकीनंतर किम हे कठोर कारवाईचा विचार करत असल्याची माहिती उत्तर कोरियाचे विदेशमंत्री री योंग-हो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांना दिली.

अमेरिकेला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर उत्तर कोरियाला संपवावे लागेल. किम जोंग उन हे मूर्ख आहेत. उत्तर कोरियाच्या मूर्खाला स्वतःच्याच देशात उपाशी मरत असलेल्या लोकांची आणि त्यांच्या हत्येची चिंता नाही. किमने विचारसुद्धा केला नसेल असा धडा त्याला शिकवू असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर किम यांनी जगासमोर माझा आणि माझ्या देशाचा अपमान केल्याने त्यांना याची किंमत द्यावी लागेल असे वत्तव्य केले.