|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कासवर ऑनलाईन पर्यटकांबरोबरच ऑफलाईनवाल्यांना ही प्रवेश

कासवर ऑनलाईन पर्यटकांबरोबरच ऑफलाईनवाल्यांना ही प्रवेश 

वार्ताहर/ कास

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा पुष्प हंगाम ऐन बहरात असून येथील रंगीबेरंगी दुनियेचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने कासला गर्दी करत आहेत. शनिवार व रविवारी विकेंडला तर गर्दी ओव्हरप्लो होत असल्याने वनविभाग व कार्यकारी समितीने फक्त ऑनलाईन बुकींग करून येणार्या पर्यटकांनाच प्रवेश देण्याचे धोरण मागील आठवडय़ापासून अमलात आणायला सुरूवात केली.  पन लांबून येणारे पर्यटक व बामणोली भागात जानारे पर्यटक यांची होणारी गैरसोय बघता फक्त ऑनलाईन बुकींग वाल्यांनाच कास वर प्रवेश ही घोषणा पोकळ ठरली असून कासवर ऑनलाईन पर्यटकांबरोबरच ऑफलाईन पर्यटकांनाही प्रवेश मिळत असल्याने मर्यादित पर्यटन ही संकल्पना फोल ठरली आहे.

कासच्या अधिकृत हंगाम एक सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. सुरूवातीला सरसकट पर्यटकांना कासवर प्रवेश देण्यात आला. पन विकेंडला होणारी पर्यटक व गाडय़ांची प्रचंड गर्दीने कासवरील नियोजन ढासळू लागले.  पन लगेचच विकेंडला ऑनलाइन बुकींग करून येणार्या पर्यटकांना प्रवेश हे धोरण राबविण्यास सुरूवात झाली.  पहिल्या शनिवार  बोगद्यात वनविभाग व पोलिस कर्मचारी यांनी तिकीट पाहूनच पर्यटकांना कास रस्त्याला सोडले.  पन बुकींग करून न येणारे तसेच बामणोली व वरती ईतर भागात जाण्यारे पर्यटक यांची गैरसोय झाली.  त्यातून पर्यटक व व्यवस्थापन यांच्या मधे वादविवाद होवू लागले.  बामणोली भागातील सर्व बोट चालकांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडे धाव घेत कासमुळे बामणोली भागातील व्यावसायिक यांचे या निर्णयामुळे होणारे नुकसान याबाबत निवेदन दिले.  आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बामणोली ला जानार्या पर्यटकांना अडवण्यात येणार नाही असे सांगितले.

पन याच निर्णयाने वनविभागाची कासला फक्त ऑनलाइन बुकींग धारकाना सोडताना अडचण होत आहेत.  ज्यांना बुकींग मिळाले नाही अशे  पर्यटक बामणोली ला जायचे आहे असे सांगून कासकडे प्रवेश मिळवत आहेत.

पठारावर आल्यावर कार्यकारी समितीने ही पठारावर आलेत तर माघार कसे पाठवायचे असे धोरण ठेवल्याने सर्वांनाच पठाराचे दर्शन मिळत आहे.

पठारावर पूर्वीचे बुकींग ऑफिस हलवून घाटाई फाटय़ावर हलवण्यात आले असून पठारावर वाहनांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे ऑफिस हलवण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी सांगितले.

Related posts: