|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार

शाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार 

वार्ताहर/ शाहूपुरी

शाहूपुरी ग्रामपंचायत परिसरात गेली पंधरा दिवस वीज वितरण विभागाचा खेळ- खंडोबा सुरू असून दिवस-रात्र येथील वीज गायब होत असल्याने नागरिकांची विजेअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने जर विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाहूपुरी ग्राम विकासाचे सदस्य नवनाथ जाधव यांनी दिला आहे.

  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाहूपुरी ग्रामपंचायत जिह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक कॉलनी येतात. अनेक छोटे-मोठे उद्योग ही येथे आहेत. असे असताना गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरण विभागाचा आंधळा कारभार सुरू असून त्याचा फटका नागरिकांना सोसावा लात आहे. तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील देशपांडे मारुती मंदिर ते आझाद नगर या परिसरात स्ट्रिट लाईट बंद पडत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महावितरणचे अधिकारी दखल घेत नाहीत, त्यामुळे शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने त्वरीत दुरूस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

…अन केली दुरुस्ती

तक्रारीनुसार बुधवारी रात्री वीज वितरण विभाग, करंजे कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले असता, खांबावरील वीज तारा एकमेकांना चिकटल्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु, पावसाळ्यात रात्री खांबावर चढून काम करणे धोकादायक असल्याने गुरुवारी सकाळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱयांनी योग्य ती दुरुस्ती करून विजपुरवठा सुरळीत चालू केला, असे नवनाथ जाधव यांनी सांगितले.

Related posts: