|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पारंपारीक मच्छिमाऱयांना अनुदान द्यावे- मॅगी सिल्वेरा

पारंपारीक मच्छिमाऱयांना अनुदान द्यावे- मॅगी सिल्वेरा 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात जवळपास 2000 पारंपारीक मच्छिमार असून यातील फक्त 1000 मच्छिमारांना अनुदान देण्यात आले आहे. बाकीच्यांना गेली सहा महिने कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळालेल नाही. यासंदर्भात आम्ही संबधित खात्याशी संपर्क साधला असता खात्याला सरकारकडून निधी मिळाले नसल्याचे सांगितले जाते असा आरोप भारत मुक्ती मोर्चा चे अध्यक्षा मॅगी सिल्वेरा यांनी पत्रकार परीषदेत केला.

यावेळी सिल्वेरा यांनी सांगितले की यासर्व प्रकाराची माहीती आम्ही मच्छिमार मंत्री विनोद पालयेकर यांना दिली असून त्यांनी आम्हाला अनुदान मिळणार असे आश्वासनही दिलेले होते. पण अजून यावर काहीही कारवाई झालेली नाही. आमची मागणी आहे की मंत्री विनोद पालयेकर यांनी याप्रकाराची गंभिर्याने चौकशी करुन या पारंपारीक मच्छिमाऱयांना न्याय मिळवून द्यावा.

गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयकरण हे राज्यातील नद्यांसाठी घातक आहे. या नद्यावरंच मच्छिमारांचा व्यवसाय चालत असून या नद्यांच्या राष्ट्रीयकरणांमूळे त्यांच्या व्यावसायाला तडा बसणार असणार आहे. तसेच यामुळे जैवविविधतेलाही त्रास होणार आहे. यासर्वांचा विचार करुन मंत्री विनोद पालयेकर पुढील पावले उचलावी असे सिल्वेरा यांनी पुढे सांगितले.

राष्ट्रीय हरीत लवादाचे कार्यालय पूण्याहून दिल्लीला नेण्यासंबधीत भारत मुक्ती मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. पूण्यात जागा नसेल तर  हे कार्यालय गोव्यात आणावे, हे लोकांच्याहीतासाठी आहे. आणि गोव्यात यासाठी खुप जागा आहे, असे संजय परेरा यांनी सांगितले

Related posts: