|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘आलमट्टी’चे 20 दरवाजे उघडले

‘आलमट्टी’चे 20 दरवाजे उघडले 

विजापूर

गत आठवडय़ामध्ये महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आलमट्टी धरण संपूर्ण भरले आहे. धरणामध्ये पाण्याचा प्रवाह 1 लाख क्यूसेकने वाढला आहे. यामुळे धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले असून 88 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.

आलमट्टी धरणाच्या 26 दरवाजांपैकी 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच जलविद्युत पेंद्रासाठी 45 हजार क्यूसेक पाणी अतिरिक्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे 290 मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या धरणात जेवढे पाणी येत आहे. त्याच प्रमाणात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णेची पाणी पातळी थोडी खालावली आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक येथून पुढे कमी होणार आहे.

विजापूर जिल्हय़ातील भीमा नदीच्या पाण्याची पातळीत मात्र अद्यापही वाढच होत आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी नदीचा प्रवाह 4.80 मीटर वरून 5.40 मीटर वाढल्याने सोन्न बॅरेजमध्ये 70 हजार क्यूसेक पाणी येत आहे. त्यामुळे या बॅरेजचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच तेवढेच पाणी धरणातून बाहेर सोडण्यात येत आहे. यामुळे भीमेच्या पाणी पातळीत अजूनही वाढण्याची शक्यता आहे, असे केएनएनएलचे अधिकारी के. एस. सालीमठ यांनी कळविले आहे. बऱयाच वर्षानंतर जिल्हय़ातील कृष्णा आणि भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्यामुळे या भागातील जनतेला आनंद झाला आहे.

पुराचा सामना करण्यास प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी पी. ए. मेघण्णावर

जमखंडी : बागलकोट जिल्हय़ातील मलप्रभा, घटप्रभा नद्यांपेक्षा कृष्णा नदीला प्रवाह अधिक असला तरी पुराचा कोणताही धोका नसून तरी पण खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन पुराचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. ए. मेघण्णावर यांनी जमखंडीत रमा निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी जमखंडी तालुक्मयातील हिप्परगी धरणातून पुढे आलमट्टी धरणाकडे जात आहे. आलमट्टीत पूर्ण क्षमतेची 519.6 मीटर पातळी ठेवून पाणी विसर्ग सुरू असल्याचे पी. ए. मेघण्णावर यांनी सांगितले. पूर परिस्थितीचा सामना करण्याकरिता तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या बैठका घेण्यात आल्या असून नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जखमंडी तालुक्मयात कृष्णा पूरग्रस्त 27 खेडी असून त्यात तत्काळ होणाऱया 11 खेडय़ांना प्राधान्य देऊन 9 बोटी, जलतरणपटू, सेफ्टी जॅकेट, स्थलांतर करावे लागल्यास त्यांना नित्य उपयोगी साहित्य पुरविण्याची तयारी असल्याची माहिती दिली.

पुढील महिन्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या जमखंडीला भेट देणार असून ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. त्यादृष्टीने कामाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी मेघण्णावर यांनी भेट दिली व नंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. कुडची-बागलकोट रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाच्या प्रक्रियेतील काही अडचणींमुळे विलंब झाला असला तरी आता परत 30 कोटी याकरिता मंजूर झाले असून त्यापैकी 17 कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जानेवारी 2018 मध्ये जिल्हय़ातील नवे तालुके कार्यरूपात येत असून काही गावे नव्या तालुक्मयात समाविष्ट केल्यास तालुका केंद्रापासून दूर अंतर होत असल्याचे कारण देऊन तक्रारी आल्याने त्यावर विचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत जमखंडी सहआयुक्त रविंद्र करलिंगनवर, तहसीलदार प्रशांत चनगोंड, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी एन. वाय. बसरीगिडद, नगरपालिका आयुक्त गोपाल कासे, महसूल निरीक्षक बसवराज सिंधूर आदी उपस्थित होते.

Related posts: