|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले

शिवसेनेने सोडले तर पवारांचा हात धरु : आठवले 

ऑनलाईन टीम / हिंगोली :

शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरु, असे सूचक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केले.

राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेना देत आहे. या पार्श्वभूमीवर आठवले बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजप सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरु. यावेळी त्यांनी ऍट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरावरही भाष्य केले. ते म्हणाले, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर तो चुकीचा आहे. मात्र, दलितांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी या कायद्याची तेवढी गरज असून, हा कायदा रद्द करणे किंवा दुरुस्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.

Related posts: