|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » भारतच दहशतवादाची जननी ; पाकचा कांगावा

भारतच दहशतवादाची जननी ; पाकचा कांगावा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे, असे वक्तव्य पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलीहा लोधी यांनी केले. तसेच पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये भारताकडून दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही लोधी यांनी केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. भारताकडून पाकिस्तानचा उल्लेख ‘टेररिस्तान’ असा करण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने भारतच दहशतवादी जननी असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन शेजारील राष्ट्रांमध्ये संघर्ष टळावा, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असल्यास त्यांनी भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याच्या सूचना कराव्यात असा कांगावाही पाकिस्तानने केला.