|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » राणेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

राणेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण 

ऑनलाईन टीम / अकोला :

नारायण राणेंना काँग्रेस समजलीच नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे दिला.

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या विधान परिषदेच्या सदस्येत्त्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांसह पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला होता. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर हवे ते पद मागा, असे सांगत महसूल काढून उद्योग खाते दिले, असा आरोप राणेंनी केला होता. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पद बदलवण्याचा आरोप केला. त्यांना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही. पदं मुख्यमंत्री बदलत नाही. कोणाला काय पद द्यायचा ते काँग्रेसचे वरिष्ठ ठरवतात.

तसेच नारायण राणेंचा अंतिम निर्णय माहित नाही. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही केलेली नाही. राणेंनी कुठेतरी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

Related posts: