|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकवणार

ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकवणार 

चिपळूण

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच शिवसैनिकांनी झोकून देऊन शेवटच्या क्षणापर्यंत काम करुया आणि सर्वच ग्रामपंचायतीवर भगवा फडकवुया. यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन आमदार सदानंद चव्हाण यांनी केले.

  शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांची उपस्थिती पाहता आपण कमावलेले हे वैभव आहे. जसे हे वैभव वाढतेय तशी आपली जबाबदारी वाढत असून ती टिकवण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. पदाधिकाऱयांच्या नेमणुका करतेवेळी कोणीही जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी नाराज न होता आपण शिवसैनिक म्हणून सतत पक्षासाठी काम केले पाहिजे.

  जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले की, नगर परिषदेमध्ये शिवसेनेला यश मिळूनही थोडक्यात पराभव पत्करावा लागला. मात्र हा प्रकार आता थांबला पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला पराभवाची चिड निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण ही पराभवाची पोकळी भरुन काढू शकत नाही. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी, आमदार चव्हाण हे सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व असल्याने ते नक्कीच आमदारकीची हॅटट्रीक साधतील, असे सांगितले.

  यावेळी क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, शहरप्रमुख राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, उपसभापती शरद शिगवण, संदीप सावंत, भगवान शिंदे, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, सुधीर शिंदे, भगवान बुरटे, सदस्य राकेश शिंदे, नगरसेविका सुरैया फकीर, स्वाती दांडेकर, सुषमा कासेकर, जयश्री चितळे, विनोद झगडे, माजी जि. प. अध्यक्ष बुवा गोलमडे, महेश नाटेकर, सुचिता सुवार, विकी नरळकर, उमेश सकपाळ, महिला आघाडी संघटक रेश्मा पवार, सीमा चव्हाण, अनुजा चव्हाण आदी उपस्थित होते.