|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » लठ्ठ महिला इमान अहमदचा आबूधाबीत मृत्यू

लठ्ठ महिला इमान अहमदचा आबूधाबीत मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱया इमान अहमदचा आबूधाबीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर भारतातील मुंबई येथे उपचार सुरू होते त्यानंतर तीला पुढील शस्त्रक्रीयेसाठी आबूधाबी येथे नेण्यात आले . तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मुळच्या इजिप्तच्या असणाऱया इमान अहमदचे वजन तब्बल 500 किलो होते.जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून तिची ओळख होती. त्यानंतर तिला वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या सैफी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेत तिचे तब्बल 200 किलो वजन कमी झाले. त्यानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी इमानला आबूधाबीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.