|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » Top News » मोदींकडून ‘सौभाग्य’ योजना जाहीर

मोदींकडून ‘सौभाग्य’ योजना जाहीर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ‘सौभाग्य’ योजनेची घोषणा केली. 16 हजार 320 कोटींची ही योजना असून, चार कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या अंतर्गत गरिबांना मोफत वीज कनेक्शन मिळणार आहे. आर्थिक जनगननेमधील कुटुंबांना मोफत वीज जोडणी तर आर्थिक जनगननेमध्ये नाव नसणाऱया कुटुंबांना 500 रुपये भरुन वीज जोडणी करण्यात येणार आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि राजस्थानमधील गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील महिलांना केंद्रस्थानी ठेऊन वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवेबाबत देखील या योजनेत तरतुद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पाच एलईडी बल्ब, पंखा आणि सोलर पावर पॅक देण्यात येणार आहे.

Related posts: