|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हातखंब्यानजीक ढाब्यावर धाड, दारू साठा जप्त

हातखंब्यानजीक ढाब्यावर धाड, दारू साठा जप्त 

व्हिस्की, बीअरसह 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा

प्रतिनिधी /रत्नागिरी

हातखंबानजीकच्या एका प्रसिद्ध ढाब्यावर धाड टाकत पोलीसांनी व्हिस्की, बीअर असा सुमारे 80 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चावरे यांनी याविषयी फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी उमेश सुरेश आंबेरकर (31, भोके, रत्नागिरी) व बाबू म्हाप (हातखंबा) अशा दोघांविरूद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आंबेरकर आला अटक करण्यात आली आहे. आंबेकर यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हातखंबानजीक एका राजकीय पदाधिकाऱयाचा प्रसिद्ध ढाबा आहे. या ढाब्यावर परवाना नसताना विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास ढाब्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी व्हिस्की, बीअर असा 81 हजार 706 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप सुर्यवंशी याविषयी अधिक तपास करत आहेत.

Related posts: